Dnyandeep Lavu Jagi

220.00

महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे. त्यातील शिरोमणी म्हणून संत नामदेव महाराजांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. भगवंताशी त्यांच्या असलेल्या लडिवाळ नात्याचा संदर्भ त्यांच्या अभंगात आढळतो. ‘नाचू किर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।’ अशी साद घालीत नामदेव महाराजांनी वारकरी परंपरेचा, पाया भक्कम केला. काल्याची परंपरा सुरू करून सामाजिक ऐक्याची मुहूर्तमेढ रोवली. पाच वेळा भारतभ्रमण करून समाज…

Category: ,

Description

महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे. त्यातील शिरोमणी म्हणून संत नामदेव महाराजांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. भगवंताशी त्यांच्या असलेल्या लडिवाळ नात्याचा संदर्भ त्यांच्या अभंगात आढळतो. ‘नाचू किर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।’ अशी साद घालीत नामदेव महाराजांनी वारकरी परंपरेचा, पाया भक्कम केला. काल्याची परंपरा सुरू करून सामाजिक ऐक्याची मुहूर्तमेढ रोवली. पाच वेळा भारतभ्रमण करून समाज जागृतीचे प्रचंड कार्य केले. पंजाबात जाऊन तिथल्या समाजाशी एकरूप होत अनेक मराठीमिश्रित हिंदीत लिहून विठ्ठलभक्ती व्यापक केली. राष्ट्रीय एकात्मता साधणे, समाजातील जाती, धर्म, अनिष्ट चालीरिती नष्ट करण्यासाठी त्यांनी अविरतपणे लढा उभारला. शीख धर्माच्या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘गुरुग्रंथसाहेब’ ग्रंथामध्ये त्यांच्या अभंगाना मानाचे स्थान देण्यात आले आहे, नव्हे शीख धर्माचा पायाच त्यांनी घातला आहे. महाराष्ट्रात समतेचा, ऐक्याचा पाया मजबूत करून उत्तर भारतातही बंधुभावाचा झेंडा घेऊन, जाणारे नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचे खरे उद्गाते आहेत. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून उभी आहेत. क्षणोक्षणी टाळमृदंगाचा गजर महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या कान्याकोपऱ्यात ऐकू येतो. तो मनोभावे जपावा. मनामनात रुजावा. यासाठी बबन शिंदे यांनी ‘ज्ञानदीप लावू जगी’ ही कादंबरी वाचकांच्या हाती देण्याचे फार मोठे धाडस केले आहे. यात कोठेही काल्पनिकता, चमत्कार नसून ते वस्तुस्थितीवर आधारित मांडले आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचकांना निश्चित आवडेल याची मला खात्री आहे.

Additional information

Author

Language

Pages

132

Type

ISBN

978-93-94214-84-2

Date of Publishing

26/12/2023

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dnyandeep Lavu Jagi”

Your email address will not be published. Required fields are marked *