Vanchitanche Raje Chatrapati Shahu Maharaj

(1 customer review)
120.00

दर्जेदार बालसाहित्य आणि बबन शिंदे हे समीकरण झाले आहे. काय लिहावं, कसं लिहावं आणि का लिहावं, याचा छानसा ताळमेळ बसवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे वाङ्मय बालकुमार किशोरांना मनापासून भावते.अलगद पचनी पडते. वाचकांना खिळवून ठेवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. एखादा विषय कशा पद्धतीने मांडल्याने तो वाचकांना चटकन आवडेल याची ते फारच खबरदारी घेतात. कमी शब्दांत जास्त आशय…

Category: ,

Description

दर्जेदार बालसाहित्य आणि बबन शिंदे हे समीकरण झाले आहे. काय लिहावं, कसं लिहावं आणि का लिहावं, याचा छानसा ताळमेळ बसवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे वाङ्मय बालकुमार किशोरांना मनापासून भावते.अलगद पचनी पडते. वाचकांना खिळवून ठेवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. एखादा विषय कशा पद्धतीने मांडल्याने तो वाचकांना चटकन आवडेल याची ते फारच खबरदारी घेतात. कमी शब्दांत जास्त आशय रंजकपणे कसा मांडावा, यांचे तंत्र त्यांना साध्य झाले आहे. ‘वंचितांचे राजे – शाहू महाराज’ ही किशोर कादंबरी त्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण शैलीत वाचकांसमोर ठेवली आहे. नेटके संवाद, सहज, सोपी आणि प्रवाही भाषा यामुळे वाचनाची रंगत वाढली आहे. थोरपुरुष, राजे महाराजे यांच्याबद्दल मुलांना प्रचंड उत्सुकता असते. शाहू महाराजांच्या अफाट कार्याची ओळख नव्यापिढीला व्हावी, गोरगरीब, कास्तकार आणि वंचित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा, त्यांच्या न्यायहक्कासाठी केलेले कार्य अनमोल आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा दिलेला अधिकार हे मराठी माणसाला कधीही विसरता येणार नाही. त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचायला हवी.

Additional information

Author

Language

ISBN

978-93-94214-32-3

Pages

40

Date of Publishing

06/12/2023

Type

1 review for Vanchitanche Raje Chatrapati Shahu Maharaj

  1. dhanraj

    लोक राजा

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *