Vanshika

240.00

‘वंशिका’ मानवी नात्यांचा हळुवार मागोवा घेणारा लघुकथा संग्रह ! मीनाक्षी मोहरील या लेखिकेने, ‘वंशिका’ या कथा संग्रहातील कथा बीजं, सभोवताल घडणाऱ्या घटनांमधून वेचकपणे निवडली आहेत, मनोज्ञपणे फुलवली आहेत आणि त्यातून नात्यांचा एक सुरेख गोफ विणण्यात ती यशस्वी झाली आहे ! ओघवती भाषा, कथेला साजेशी शब्दकळा या सोबतच मानवी जीवनाकडे करुणामय सहृदयतेने बघण्याची तिची दृष्टी मनाला…

Description

‘वंशिका’ मानवी नात्यांचा हळुवार मागोवा घेणारा लघुकथा संग्रह !
मीनाक्षी मोहरील या लेखिकेने, ‘वंशिका’ या कथा संग्रहातील कथा बीजं, सभोवताल घडणाऱ्या घटनांमधून वेचकपणे निवडली आहेत, मनोज्ञपणे फुलवली आहेत आणि त्यातून नात्यांचा एक सुरेख गोफ विणण्यात ती यशस्वी झाली आहे ! ओघवती भाषा, कथेला साजेशी शब्दकळा या सोबतच मानवी जीवनाकडे करुणामय सहृदयतेने बघण्याची तिची दृष्टी मनाला भावते.
निर्लेप नातं, मैत्री, वार्धक्य, प्रारब्ध, वंशिका, घटस्फोट, इच्छा, ऋणानुबंध असे अनेक जिव्हाळ्याचे विषय ती लीलया हाताळते. कधी दिव्यांग मुलीबद्दलची पालकांची व्यथा मांडते तर कधी बाळाला नऊ महीने गर्भाशयात जीवापाड जपूनही रिकाम्या हाताने घरी परतणाऱ्या अभागी मातेची गोष्ट सांगते. या कथा वाचनीय आहेत आणि सहज लक्षात देखील राहतात त्या त्यांच्या घटनाप्रधानतेमुळे !
मीनाक्षी मोहरील या लेखिकेची उत्तम वर्णनशैली सोबतच तिची अनुभव घेण्याची तरलता लक्ष्यवेधी ठरते.
‘वंशिका’ हे कथेचेच शीर्षक असलेला हा कथासंग्रह त्याच्या मुखपृष्ठापासूनच एक सघन वाचनानुभव आहे.

डॉ. स्वाती धर्माधिकारी
मानस शास्त्रज्ञ, समुपदेशक
प्राचार्य, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, नागपूर.

Additional information

Weight 0.150 g
Author

Language

ISBN

978-93-87939-62-2

Pages

136

Type

Date of Publishing

23/01/2021

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vanshika”

Your email address will not be published. Required fields are marked *