MANMORACHA PISARA

140.00

प्र. श्री. जाधव यांनी या ललित लेखाला शब्दसौंदर्याने नटवले आहे. त्यामुळे त्यांच्या लिखाणात ओघवत्या भोषेचे रूपदर्शन होते. हे रूपसौंदर्य एखाद्या जलनर्तनासारखे थुईथुई करीत आले आहे. म्हणून या ललित लेखसंग्रहाचे शीर्षक ‘मनमोराचा पिसारा’ असे दिले आहे. कारण मोरपिसारा देखणा असतो. मनोहरी रंगच्छटा मोहवून टाकतात. लेखक प्र. श्री. जाधव यांच्या मनातील मयूर पिसारा कागदावर उतरविण्यात ते यशस्वी…

Description

प्र. श्री. जाधव यांनी या ललित लेखाला शब्दसौंदर्याने नटवले आहे. त्यामुळे त्यांच्या लिखाणात ओघवत्या भोषेचे रूपदर्शन होते. हे रूपसौंदर्य एखाद्या जलनर्तनासारखे थुईथुई करीत आले आहे. म्हणून या ललित लेखसंग्रहाचे शीर्षक ‘मनमोराचा पिसारा’ असे दिले आहे. कारण मोरपिसारा देखणा असतो. मनोहरी रंगच्छटा मोहवून टाकतात. लेखक प्र. श्री. जाधव यांच्या मनातील मयूर पिसारा कागदावर उतरविण्यात ते यशस्वी झाले आहेत. म्हणून वाचक वाचनप्रक्रियेत गढून जातो. त्या पिसाऱ्यातील रंगच्छटा भावमुक्त नि विमुक्त होऊन आल्या आहेत. मोर जसा सुंदर दिसतो, तसाच हा लेखसंग्रहही अमित मनोहर आहे. देखणा आहे. यातील भाव-विभाव काही और आहेत. या संग्रहात रसाळ शब्दमाधुर्याची प्रचिती येते. काव्यात्मक प्रतिभेच्या संवेदना ह्या सौंदर्यानुभूतीचे विभ्रम घेऊन येतात. मानवी जीवनजाणि‍वेचे तत्त्वसार आणि त्याचा आविष्कार, भावमंतर झालेला निसर्ग, सुरेख शब्दसौंदर्य आणि शब्दलालित्य याचा सुंदर गोफ गुंफून जाधव यांनी ललित लिखाणाचे सौंदर्य खुलवले आहे. निळ्या निळाईच्या अंबरघन, श्रावणसरी ह्या ललित लेखकांच्या प्रतिभेला प्रवाहित करतात आणि त्यातून फुलते-फुलारते एक जीवशीव तत्त्व. जे की, निसर्गराजीत समाविष्ट झालेले ते एक गूढ विवर आहे. भलेही यास कोणी ‘कृष्ण विवर’ म्हणतील; पण असेच एक विवर या लेखाच्या माध्यमातून पुढे आले आहे. कळत-नकळत संधीप्रकाशाच्या भावस्फुल्ल रंगच्छटा प्रस्फुटित झाल्या आहेत. म्हणून या ललित लेखातील गद्य स्वरूपातील हे दीर्घकाव्य भावविभोर होऊन आले आहे. हे शब्ददान असेच शब्ददहिवरात फुलत राहो.

Additional information

Weight 0.160 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-52-1

Pages

62

Type

Date of Publishing

3/12/2023

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “MANMORACHA PISARA”

Your email address will not be published. Required fields are marked *